नाशिक

बंकेच्या मतदार यादीवर पन्नास हरकती बंकेच्या मतदार यादीवर पन्नास हरकती

CD
लोगो : जळगाव जिल्हा बँकेची इमारत ------------- जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर पन्नास हरकती ------ शुक्रवारी सुनावणी; अंतिम यादी १४ला प्रसिद्ध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर आजपर्यंत एकूण ५० हरकती दाखल झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विभागाकडे देण्यात आली. यावर आता येत्या नऊ ऑक्टोबरला सुनावणी व १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा सहकार निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन हजार ५६८ मतदारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरअखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक १५ हरकती जळगाव तालुक्यातून आल्या आहेत. जामनेर, पाचोरा व पारोळा या तीन तालुक्यांतून एकही आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. दाखल हरकतींमध्ये प्रामुख्याने मतदारांच्या नावातील दुरुस्ती, काही व्यक्तींची एकापेक्षा जास्त ठिकाणी आलेली नावे व तांत्रिक त्रुटींबाबत आक्षेप नोंदविले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातून ७, तर यावलमधून ५ हरकती आल्या आहेत. धरणगाव व एरंडोल तालुक्यांत प्रत्येकी ४ आक्षेप आहेत. चाळीसगाव, भडगाव, रावेर व बोदवड या तालुक्यांमधून प्रत्येकी तीन हरकती आहेत. -------------- तालुकानिहाय आलेल्या हरकती जळगाव १५, मुक्ताईनगर ७, यावल ४, धरणगाव ४, एरंडोल ४, रावेर ३, बोदवड ३, भडगाव ३, चाळीसगाव, ३, भुसावळ, १, अमळनेर, चोपडा १ अशा एकूण ५० हरकती आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT