शहर टुडे पान चारसाठी
--------------------
लोकतंत्र सेनानी संघाचा उद्या
जिल्हास्तरीय कुटुंब मेळावा
-------
माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : आणिबाणीच्या काळात मिसाबंदी म्हणून कारावास भोगलेले, लोकशाहीच्या रक्षणासाठी सत्याग्रह केलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्हास्तरीय मेळावा गुरुवारी (ता.१९) जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकतंत्र सेनानी संघातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाहूनगर हाउसिंग सोसायटीच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री तथा मिसाबंदी प्रकाश जावडेकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जळगावच्या खासदार स्मिता वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दीक्षित, सचिव श्रीपादराव ओगले प्रमुख पाहुणे राहतील. आणीबाणीच्या काळातील अनुभव, लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष व लोकतंत्र सेनानींच्या योगदानाबाबत यावेळी मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मिसाबंदी, सत्याग्रही व त्यांच्या वारसांनी या मेळाव्याला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुळकर्णी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.