जिल्हा बँकेचा फोटो वापरावा)
---
जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
---
माघारीसाठी केवळ चारच दिवस
---
विरोधातील उमेदवारांच्या माघारीसाठी प्रबळ दावेदारांची होणार दमछाक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रक्रियेत ११ पर्यंत शासकीय कार्यालयांना सुट्या असल्याने आता १२ ला कार्यालय सुरू होईल. १७ पर्यंत माघारीची मुदत आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर माघारीसाठी सुटीचे दिवस वगळता केवळ चारच दिवस शिल्लक राहतील. यात किती जण माघार घेतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. प्रबळ दावेदारांची विरोधातील उमेदवारांच्या माघारीसाठी धावपळ होणार आहे
निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महायुती होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत अद्याप जागावाटपाची चर्चा झालेली नाही. यामुळे महायुतीबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीने १५ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्या अंतर्गत बैठकांना वेग येणार आहे. मात्र, १७ नोव्हेंबरच्या माघारीनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
तालुकानिहाय निवडणूक रिंगणातील चित्र
---------
तालुका--प्रमुख उमेदवार--चित्र
* जळगाव--पालकमंत्री गुलाबराव पाटील, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील, प्रभाकर सोनवणे-- चुरस
* चाळीसगाव-- आमदार मंगेश चव्हाण, प्रदीप देशमुखांसह सात उमेदवार--चुरस
* पाचोरा-- सतीश शिंदे--बिनविरोध होण्याची शक्यता
* अमळनेर-- जयश्री पाटील, प्रफुल्ल पवार-- प्रतिष्ठेची लढत
* पारोळा-- नलिनी पाटील--बिनविरोध होण्याची शक्यता
* एरंडोल-- मृणाल पाटील--बिनविरोध होण्याची शक्यता
* भुसावळ-- रजनी सावकारे--बिनविरोध होण्याची शक्यता
* धरणगाव-- प्रताप पाटील, सोनल पवार, संग्रामराजे पवार, गायत्री पाटील-- चुरस
* चोपडा-- आमदार चंद्रकांत सोनवणे, घनशााम अग्रवाल, रोहित निकमसह नऊ उमेदवार-- चुरस
* रावेर-- आमदार नंदकिशोर महाजन, राजेश वानखेडे इतर नऊ उमेदवार--चुरस
* यावल-- विनोद पाटील, प्रशाांत चौधरीसह सह उमेदवार-- चुरस
* भडगाव--पूनम पाटील, सोमसिंग पाटील, प्रशाांत पवार, विजयकुमार देशमुख--चुरस
* बोदवड-- मधुकर राणे, रुपेश गांधींसह तीन उमेदवार--चुरस
* मुक्ताईनगर--केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, देवयानी देशमुख, विनोद तराळ, योगेश कोलतेंसह चार उमेदवार--चुरस
-----------
निवडणुकीतील काही निरीक्षणे
* घराणेशाही विरुद्ध स्थानिक कार्यकर्ते : अनेक ठिकाणी नेत्यांच्या पत्नी किंवा मुलांना संधी
* नवीन चेहऱ्यांची कसोटी : चाळीसगाव, जळगाव, रावेर, चोपडा, मुक्ताईनगरमध्ये स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता
* बिनविरोध निवडीचे गणित : पारोळा, एरंडोल, भुसावळ आणि पाचोरा येथे बिनविरोध निवडीची शक्यता. अंतिम निर्णय माघारीनंतर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.