नाशिक

जिल्हा बँक निवडणूक पान १

CD
जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो) --- NSK26H35233 जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत माघारीवेळी झालेली गर्दी. --- बारा उमेदवार बिनविरोध; ९ जागांसाठी ४१ रिंगणात उपशीर्षक रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांविरोधात उमेदवारी कायम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर मंगळवारी (ता. १७) १२ उमेदवार बिनविरोध झाल्याचे निश्‍चित झाले आहे, तर उर्वरित नऊ जागांसाठी आता ४१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये मंत्रीद्वय गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून, मंगळवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. या निवडणुकीत भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांची महायुती झाली आहे. पूर्ण निवडणूकच बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न झाले, पण तसे होऊ शकले नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला असून, त्याठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्याची उमेदवारी कायम राहिली, तर चाळीसगावातही आमदार मंगेश चव्हाणांविरोधात उमेदवारी कायम आहे. अन्य सात जागांवरही इतर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ९ जागांवर होणाऱ्या लढतींमध्ये चुरस पाहायला मिळेल. ---- चौकट बिनविरोध उमेदवार असे मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांमध्ये भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह रोहित निकम, माधुरी अत्तरदे, रजनी सावकारे, तर शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार पुत्र सुमीत पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील, भडगावचे सोनसिंग पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोनल संजय पवार, जयश्री अनिल पाटील यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT