नाशिक

जिल्हा बँक निवडणूक

CD
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्‍चित --- भाजप १०, शिवसेना ७ अन्‌‍ राष्ट्रवादी चार जागा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘महायुती’च्या माध्यमातून लढण्यात येणार असून, २१ जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला गुरुवारी (ता. १२) झालेल्या महायुतीच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजप १०, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढविणार, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव एमआयडीसीतील बालाणी लॉन्समध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक गुरुवारी झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार किशोर पाटील वगळता महायुतीचे आमदार, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते. जागेवरून खल महायुतीच्या बैठकीत विविध कार्यकारी संस्थांसह राखीव जागांवर नेत्यांमध्ये चर्चा झाली. यात प्रामुख्याने पाचोरा आणि मुक्ताईनगर विविध कार्यकारी संस्थेच्या जागेवरून चर्चेचा खल सुरूच राहिला. दरम्यान, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित करताना भाजप १०, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी ४ यावर चर्चा झाली. दरम्यान, विरोधकांना घेऊन सर्वपक्षीय पॅनल झाल्यास जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. चौकट १७ पर्यंत माघारीची मुदत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इतर संस्था मतदारसंघातून अनिल वसंत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. १७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. १६ व १७ ला माघारीसाठी मोठी धावपळ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT