NSK26H31783
जळगाव : फत्तेपूर पोलिसांनी शेतातील वीज केबल चोरीप्रकरणी चौघांसह भंगार दुकानदाराला अटक करून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
----------
शेतातील केबल चोरणाऱ्या चौघांना अटक
---
फत्तेपूर पोलिसांची कारवाई; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : जामनेर तालुक्यातील शेतांमधून विद्युत केबल चोरून त्यातील तांबे विकणाऱ्या चौघांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदाराला फत्तेपूर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत तांबे, विद्युत केबल, कटर आणि मोटारसायकल असा ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोणी (ता. जामनेर) येथील शेतकरी गोपाळ प्रल्हाद कोल्हे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलमधील वीज केबल चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी सोमवारी (ता. ५) फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तोंडापूर येथून गणेश नारायण कोळी (वय २४), शाहरुख अजित तडवी (२८), प्रवीण धनराज गवळी (२५) आणि विकास गजानन जाधव (१९, सर्व रा. तोंडापूर, ता. जामनेर) यांना ताब्यात घेतले. तपासात चोरीच्या केबलमधील तांबे खरेदी करणाऱ्या राजीक खान लाड खान (३०, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन लोखंडी कटर, सुमारे पाच किलो तांबे, केबलमधील सुमारे ४५ किलो तांबे आणि हिरो मोटारसायकल (एमएच १९ ईएन ०८९३) असा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.