टुडे एक फ्लायर
NSK26H33874, NSK26H33875
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाजवळ महापालिकेतर्फे लावण्यात आलेला स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलकाची दुरवस्था.
------
अतिक्रमणाने ‘स्वच्छ सर्वेक्षण’लाही फासलं ‘काळं’
उपशीर्षक
प्रशासनाची उदासीनता; महापालिकेच्या मालमत्ताही प्रभावित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : शहरातील अतिक्रमणाच्या समस्येने कळस गाठला आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या विळख्याने केवळ वाहनधारक, सामान्य नागरिकच त्रस्त नाही तर या अतिक्रमणाच्या जाचातून महापालिकेच्या मालमत्ताही अलिप्त राहिलेल्या नाहीत. क्रीडा संकुलाच्या कोपऱ्यावर एका खाद्य पदार्थाच्या गाडीने ठिय्या दिला असून, त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या फलकालाही काळं फासलं गेलं आहे.
जळगाव शहरातील अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरणाची कामे झाली. मात्र, रुंद झालेले रस्ते अतिक्रमणधारकांसाठी ‘रेड कार्पेट’ बनलेत. शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठेत शिवतीर्थापासून नेहरु चौक, पुढे टॉवर व असोदा मार्गापर्यंत दुतर्फा अतिक्रमणामुळे रस्त्यांची रुंदी निम्मेपेक्षा कमी झाली आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम अद्याप झालेले नाही. मात्र, आकाशवाणी चौक ते शिवतीर्थ चौकापर्यंत कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हा रस्ता अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याचे सध्या चित्र आहे.
महापुरुषांच्या स्मारकांना विळखा
अतिक्रमणधारकांनी महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांनाही सोडलेले नाही. एकीकडे शिवतीर्थाला जी.एम. फाउंडेशनसमोरुन खाद्य पदार्थांच्या गाड्यांचा विळखा अधिक घट्ट होत आहे. बहिणाबाई उद्यानाजवळील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याभोवती अतिक्रमणाचा वेढा आहे.
क्रीडा संकुलाला विळखा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलास बसस्थानकाकडून येणाऱ्या मार्गावर व रिंगरोडकडे जाणाऱ्या बाजूने अशा दोन्ही ठिकाणी अतिक्रमणाचा वेढा आहे. या दोन्ही बाजूंकडील रस्त्यांवर दररोज एक- दोन गाड्यांची भर पडत आहे.
फलकाची दुरवस्था
क्रीडा संकुलाच्या कोपऱ्यावर स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा फलक लावण्यात आला आहे. शहराच्या सुशोभीकरणाबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम. पण, अतिक्रमणाने या फलकाचीही दुरवस्था केली आहे. याठिकाणी दुपारी चारपासून लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. वाहनांना, पायी चालणाऱ्यांनाही जागा नसते. अशात, खाद्यपदार्थांच्या गाडीमुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा फलकही काळवंडला आहे.
-----
चौकट
महापालिका प्रशासनाची उदासीनता
शहराच्या स्वच्छतेची ना अतिक्रमणधारकांना काही काळजी, ना महापालिका प्रशासनाला. आपल्याच संस्थेने लावलेल्या, त्यातही स्वच्छ शहराबाबत जागर करणाऱ्या फलकाची अतिक्रमणाने ही अवस्था करावी.. अन् महापालिकेने त्यावर कारवाई करू नये, ही शोकांतिका आहे. या प्रकाराबद्दल सामान्य नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.