महामार्गावर अपघातात जखमी
प्राैढाचा उपचारादरम्यान मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : पाळधी येथून कामावरून पायी घराकडे परतणाऱ्या ४२ वर्षीय गृहस्थाला सुसाट अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव-नाशिक राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ५३) वरील साई पॅलेस हॉटेलजवळ गुरुवारी (ता.१) सायंकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळ समाधान भगवान कोळी (वय ४२) कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. गुरुवारी (ता.१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाळधी येथून काम आटोपून पायी घराकडे येत होते. हॉटेल साई पॅलेसजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनचालकाने प्रचंड वेगात वाहन चालवून समाधान यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत समाधान यांचे भाऊ राजेंद्र भगवान कोळी (वय ३६) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे या अपघाताचा तपास करीत असून, पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.