नाशिक

जाजातप्रामणपत्र रद्द होवुनही मुळ दस्तऐवज जमा न करणे भोवलेतप्रामणपत्र रद्द होवुनही मुळ दस्तऐवज जमा न करणे भोवले

CD
जात प्रमाणपत्र रद्द होऊनही मूळ दस्तऐवज जमा न करणे भोवले जळगावात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीत मूळ जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, राम शैलेंद्र सपकाळे, शैलेंद्र सपकाळे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत टोकरेकोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली होती. या प्रमाणपत्रांची पळताळणी उपसंचालक (संशोधन) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्याकडे करण्यात आली. समितीच्या ३ सप्टेंबर २०२६च्या कार्यालयीन आदेशानुसार प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. तसेच त्यांच्याकडील मूळ जातप्रमाणपत्र जप्त करण्यात आले. त्यानंतर संशयितांना मूळ दस्तऐवज जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. संशयितांनी विहित मुदतीत मूळ दस्तऐवज जमा न केल्याने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल तहसीलदार प्रशांत रामराव निंबोळकर (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT