नाशिक

चारा टंचाई रोखण्यासाठी

CD
NSK26H34642 जळगाव : शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आदी. --------- चाराटंचाई निवारणार्थ गावनिहाय नियोजनाचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील : चारशेवर शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शेतकऱ्यासाठी पशुधन हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचा आधार आहे. शेतीचे नुकसान झाले तरी पशुधनच त्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांसह त्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. चाराटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उत्पादन, साठवणूक आणि उपलब्धतेचे नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळात शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला वाऱ्यावर सोडणार नाही; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ४०० हून अधिक शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सुरवातीला चारा साक्षरता अभियान रथाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यासाठी ७४१ क्विंटल वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, चंद्रकांत बोडरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आदी उपस्थित होते. उपाययोजना करा जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू झाल्या असून चाऱ्याच्या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यानंतर नव्हे, तर त्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी आभार मानले. --------- चौकट.... शेतातील एकही काडी वाया जाऊ देऊ नका जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, आगामी ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य चारा गरज लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. शेतातील एकही काडी वाया न घालवता तिचा पशुधनासाठी उपयोग करावा. पीक अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे उपयुक्त चाऱ्यात रूपांतर करावे. यासाठी गेल्या महिनाभरापासून चारा साक्षरता रथ, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. ========= ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT