नाशिक

व्याजाच्या वादातून शिवाजीनगरात गोळीबार

CD
व्याजाच्या वादातून जळगावात गोळीबार --- तलवारीने दहशत; दुचाकीवरून आले पाच ते सहा तरुण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : व्याजाच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सायंकाळी साडेसातच्या दहशतीच्या प्रकारात झाले. पाच ते सहा तरुण दुचाकींवरून शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौकात आले. त्यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय असून, हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत माजविली. क्रांती चौकातील एका तरुणाचा अन्य तरुणासोबत व्याजाच्या पैशांवरून वाद सुरू आहे. याच वादातून मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा तरुण दुचाकींवरून क्रांती चौकात आले. त्यांनी परिसरात गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले जात असले, तरी घटनास्थळी पोलिसांना गोळीबाराचे अवशेष आढळून आलेले नाहीत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये काही तरुणांच्या हातात तलवारी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रांती चौकातील एका तरुणाला पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली. व्याजाच्या पैशांवरून झालेल्या वादातूनच हा प्रकार घडला का? गोळीबार नेमका कोणी केला आणि तलवारी घेऊन आलेले तरुण कोण होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या परिसरात सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण! दहा दिवसांत सोने ७,४००, तर चांदी १५,९०० रुपयांनी स्वस्त

Pimpri Chinchwad politics : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची निवड कशी होणार? विधानसभानिहाय सूत्राची चर्चा

SCROLL FOR NEXT