नाशिक

उद्योगांना आता विदर्भ–

CD
टुडे २, मेन फिचर (जिल्हा शहर कॉलम) ---- (उद्योगांचे स्केच वापरावे) --- जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे विशेष प्रोत्साहन उद्योग-व्यापार क्षेत्राला दिवाळीची मोठी भेट; पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ–मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष औद्योगिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाने आज (ता. ४) यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योगांची उभारणी आणि विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळणार असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला औद्योगिक विकासाची महत्त्वपूर्ण भेट मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याला औद्योगिक प्रोत्साहनांच्या बाबतीत अधिक लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पाठबळ दिले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. उद्योगमंत्र्यांची सकारात्मक भूमिका पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकारातून २५ ऑगस्टला तसेच वेळोवेळी झालेल्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. जिल्ह्यातील उद्योगांना अधिक प्रोत्साहने मिळावीत, यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले होते. पात्र उद्योगांना लाभ शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात नव्याने स्थापन होणाऱ्या तसेच विस्तारीकरण अथवा विविधीकरण करणाऱ्या पात्र औद्योगिक घटकांना विदर्भ–मराठवाडा क्षेत्राप्रमाणे प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम तसेच विविध श्रेणींतील मोठ्या उद्योगांचा समावेश होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या निर्णयाचा लाभ केवळ जळगाव एमआयडीसीपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पात्र औद्योगिक प्रकल्पांसाठी लागू होणार आहे. हे आहेत लाभ... नवीन औद्योगिक धोरणानुसार पात्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या ८० टक्क्यांपर्यंत एकूण प्रोत्साहनांची कमाल मर्यादा आणि दहा वर्षांचा प्रोत्साहन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पात्रतेनुसार औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, मुद्रांक शुल्क सवलत व वीजविषयक प्रोत्साहनांच्या तरतुदीही उपलब्ध आहेत. कोट जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना न्याय मिळावा, नवीन उद्योग यावेत आणि आपल्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. आज त्या प्रयत्नांना शासन निर्णयाच्या रूपाने यश मिळाले. जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याला नवी दिशा देणारा निर्णय आहे. या निर्णयाचा लाभ घेऊन उद्योजकांनी जिल्ह्याच्या प्रगतीला नवी गती द्यावी. - गुलाबराव पाटील, पालकमंत्री ----- कोट गेल्या काही वर्षांपासून मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होतो. आता औद्याेगिक क्षेत्राला ‘डी’ दर्जाच्या प्रोत्साहनपर योजना लागू होतील, त्यातून उद्योग वाढीस लागतील. रोजगारही वाढेल. - सुरेश भोळे (राजूमामा) आमदार, जळगाव शहर ---- कोट जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार, नवीन गुंतवणुकीला चालना व प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीची वाढ होण्यास मदत होणार आहे. - श्‍यामसुंदर अग्रवाल अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, जळगाव ------ (चौकट) या दर्जामुळे मिळणारे लाभ असे - लघु-मध्यम- सूक्ष्म उद्योगांना १० वर्षांपर्यंत मिळणार प्रोत्साहनपर लाभ - औद्योगिक प्रोत्साहन अनुदान १०० टक्के मिळणार - प्रति युनिट एक रुपया वीज वापर अनुदान - वीज भाडे अनुदान ३ वर्षांपर्यंत मिळणार - कामगार इपीएफ अनुदान मिळणार - मोठ्या उद्योगांसाठी पात्रतेची गुंतवणूक २५० कोटीपर्यंत खाली - जास्तीत जास्त प्रोत्साहन ८० टक्क्यांपर्यंत -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT