नाशिक

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा कुमार-कुमारी संघ रवाना

CD
NSK26H31487 जळगाव : राज्य कबड्डी स्पर्धेसाठी रवाना झालेल्‍या कुमार-कुमारी संघातील खेळाडूंसमवेत मोहन भावसार, श्याम कोगटा, गिरीश नाईक, महेश बुटी आदी. ––– राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ रवाना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : पालघर आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा कुमार व कुमारी संघ रवाना झाला. या स्‍पर्धा ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय येथे कुमार व कुमारी खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती सदस्य प्रा. हरीश शेळके, कमलेश पाटील व प्रशांत कोल्हे यांनी अंतिम १४ कुमार व १४ कुमारी खेळाडूंची निवड केली. प्रशिक्षक आनंद महांगडे व हितेश सोनी यांनी दोन्ही संघांकडून कसून सराव करून घेतला. संघ रवाना होण्यापूर्वी जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष मोहन भावसार, अध्यक्ष श्याम कोगटा, नगरसेवक अरविंद देशमुख, कार्याध्यक्ष गिरीश नाईक यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश बुटी, संजय संसारे, सचिव नितीन बरडे, सहसचिव सुनील राणे, खजिनदार प्रा. हरीश शेळके, सदस्य ॲड. रोहन बाहेती आदी उपस्थित होते. चौकट कुमार संघ हर्षल बागुले (कर्णधार), शुभम परदेशी, यश रायसिंग, तेजेंद्र सपकाळे, शिवम सोनवणे, जुनेद खाटीक, हर्षल विसपुते, रोहित बारी, साहिल पिंजारी, करण अभांगे, निखिल वांद्रे, रोहित महाजन, रुद्रेश लखारी, करण सपकाळे, प्रशिक्षक : हितेश सोनी, व्यवस्थापक : सचिन पाटील. मुलीचा संघ हर्षदा माळी (कर्णधार), चैताली पाटील, वैष्णवी पाटील, गायत्री माळी, उर्मिला तायडे, हर्षदा पाटील, माहिया मंडल, निशा पाटील, साक्षी मराठे, प्रज्ञा जगताप, श्रावणी चोरमुले, हर्षाली वाणी, नयना माशाने, संजना महाजन, प्रशिक्षक : आनंद महांगडे, व्यवस्थापक : रुणाल वाणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT