NSK26H34895
जळगाव : लामणदिव्याच्या कलाकृतीजवळ अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के सामंत. सोबत राजेश नाईक, योगेश शुक्ल, किशोर कुळकर्णी.
--------
जगातील सर्वांत मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!
उपशीर्षक
ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्याकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : जैन उद्योग समूहाने उभारलेला जगातील सर्वात मोठा लामणदिवा ही अप्रतिम कलाकृती असून, सोशल मीडियावरील छायाचित्रे आणि रील्सपेक्षाही प्रत्यक्षातील या दिव्याचे सौंदर्य अधिक विलोभनीय आहे, अशा भावना अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी व्यक्त केल्या.
जळगाव भेटीदरम्यान त्यांनी काव्यरत्नावली चौकातील जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य लामणदिव्याची सजावट पाहिली. त्याबद्दलची माहिती आर्टिस्ट कंपनीचे माजी सहकारी राजेश नाईक व जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी दिली.
या दिव्याची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली असून, कल्पकतेने आणि आकर्षक पद्धतीने ही भव्य कलाकृती साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिवसा जितका सुंदर दिसतो, तितकेच रात्रीच्या प्रकाशात त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असेल, असे देखील नीलम यांनी सांगितले.
चौकट
संभाजीराजे नाट्यगृहाला भेट
''नाटक ही माझी पहिली आवड आहे, रंगमंचावरून अनेक मोठ्या कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. अशा आधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या नाट्यगृहाला भेट देणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे..'' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी अनिल जोशी, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार, होनाजी चव्हाण तसेच विजय पाटील आदी उपस्थित होते.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.