नाशिक

मनपा आवारात महापौरांच्या वाहनावर हल्ला

CD
सकंड मेन NSK26H31756 जळगाव : महापालिका इमारतीच्या वाहनतळ परिसरात उभी महापौर दीपमाला काळे यांची कार. --- NSK26H31757 (कारच्या टपावर रेड मार्किंग करावी) हल्ल्यात वाहनाचे झालेले नुकसान. ......... मनपा आवारात महापौरांच्या वाहनावर हल्ला अतिक्रमण कारवाईत रसवंतीची गाडी जप्त केल्याचा राग; अधिकाऱ्यांना धमकी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रसवंतीच्या गाडीवर केलेल्या कारवाईचा राग अनावर झाल्याने एका तरुणाने थेट महापालिकेच्या आवारात येत महापौर दीपमाला काळे यांच्या शासकीय वाहनावर लोखंडी दांड्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी घडली. वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाला दूर केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकाराची माहिती मिळताच महापौरांनी आयुक्त आदित्य जिवने यांच्याशी चर्चा करून संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हॉकर्स व रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरही पथकाने कारवाई केली. यावेळी एका रसवंतीच्या गाडीवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली. आपल्या गाडीवर कारवाई झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुण महापालिकेत पोहोचला. त्याने अतिक्रमण विभागात जाऊन गोंधळ घातल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने महापौरांच्या वाहनांकडे जात लोखंडी दांड्याने वाहनावर प्रहार केला. चालकाने वेळीच हस्तक्षेप करून त्याला वाहनापासून दूर केल्याने मोठी दुर्घटना टळली. अधिकाऱ्यांनाही धमकी याचवेळी संबंधित तरुणाने अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेमुळे काही काळ महापालिका आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चौकट महापौरांची आयुक्तांशी चर्चा प्रकाराची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने आयुक्त आदित्य जिवने यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. महापालिकेच्या आवारात शासकीय वाहनावर हल्ला तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकी देण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

SCROLL FOR NEXT