नाशिक

महापौरांच्या सूचनेनंतर अतिक्रमण निघाले

CD
NSK26H32733 जळगाव : महापौरांच्या सूचनेनंतर या जागेवरील निघालेले अतिक्रमण. ......... अखेर कानळदा रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्याचे शेड काढले महापौरांच्या सूचनेनंतर कारवाई; परिसराची स्वच्छता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाहणीमुळे कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. साईबाबा मंदिराजवळील जागेवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि तेथे साठविलेले भंगार साहित्य संबंधित व्यक्तीने स्वतःहून हटविले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसराची स्वच्छता केली. महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी (ता. १५) प्रभाग क्रमांक एकमधील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. या वेळी कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड उभारून भंगार साहित्य ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या जागेच्या परिसरात कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. या प्रकाराची दखल घेत महापौरांनी संबंधित व्यक्तीला जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिक्रमण न हटविल्यास महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर शुक्रवारी संबंधित व्यक्तीने स्वतःहून पत्र्याचे शेड आणि भंगार साहित्य हटवून जागा मोकळी केली. जागा रिकामी झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कर्मचारी व वाहनांच्या मदतीने परिसरातील कचरा हटवून स्वच्छता केली. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापालिका प्रशासनाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT