नाशिक

जुने बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबार

CD
जळगावात मध्यरात्री गोळीबार ---- प्रियकराच्या भावाने झाडली गोळी; दुचाकीवरील महिला जखमी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : प्रेमसंबंधाला विरोध करत प्रियकराच्या भावाने दुचाकीवरील महिलेवर गोळीबार केला. यात महिलेच्या मांडीत गोळी रुतल्याने ती जखमी झाली. दसऱ्याच्या मध्यरात्री मंगळवारी (ता. २०) ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जुने जळगावातील गोपाळपुरा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता बुधा बारेला (वय ३५) या खासगी कंपनीत कामाला आहेत. पतीचे निधन झाले असून, त्यांची पिंप्राळा परिसरातील सोनीनगरमधील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमसंबंधाला रोहनच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. दसऱ्याच्या मध्यरात्रीच थरार विजयादशमीच्या दिवशी संगीता बारेला मेहरुण तलावावर रावणदहन पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे रोहन तिला जेवणाला घेऊन जाण्यासाठी गेला. तेथून ते दुचाकीने शहरात आले. संगीताला घरी सोडण्यासाठी रोहन दुचाकीने मध्यरात्री साडेबारा ते पाऊणदरम्यान निघाला असताना, त्यांच्या मागे अनिकेत सपकाळे त्याच्या एका साथीदारासोबत आला. त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत जुने स्थानकासमोर अनिकेतने महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर गोळीबार केला. यात संगीता बारेला हिच्या मांडीत गोळी लागल्याने ती जखमी झाली. तिला प्रियकराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातत दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. चौकट गुन्हा दाखल घडल्या प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. निरीक्षक सागर शिंपी व त्यांच्या पथकाने जिल्‍हा रुग्णालयात दाखल महिलेचा जबाब नोंदविला असून, या प्रकरणी बुधवारी (ता. २१) अनिकेत मधुकर सपकाळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक सावित्री ढगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT