नाशिक

मनपाच्या (दिव्या) खालीच अंधार

CD
NSK26H33275 जळगाव : महापालिका इमारतीखाली टाकलेल्या टाइल्स अशा खचल्या आहेत. --- महापालिका टॉवरखालीच निकृष्ट कामाचा नमुना कंत्राटदाराने टाइल्स बसविल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत खचल्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : दिव्याखाली अंधार, या म्हणीचा प्रत्यय महापालिकेच्या सतरा मजली इमारतीखाली आला. इमारतीखालून गेलेल्या ड्रेनेज पाइपलाइनवर बसविलेल्या टाइल्स अवघ्या दोन दिवसांत खचल्या. या प्रकारामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका प्रशासनाच्या देखरेखीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिका टॉवरखालीच निकृष्ट कामाचा नमुना पाहायला मिळत आहे. महापालिका इमारतीखाली शिवसेना कार्यालय ते अमर रगडा यांच्यासमोरील परिसरात ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. १० ऑक्टोबरला काम पूर्ण करून कंत्राटदाराने आकर्षक टाइल्स बसविल्या. मात्र, अवघ्या २४ तासांतच या टाइल्स खचून पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात रुतल्या. काम पूर्ण होऊन दहा-बारा दिवस उलटले, तरी महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच मार्गाने अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. या निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, कंत्राटदाराला दिलेला पैसा खड्ड्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. या कामाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न दुकानदार उपस्थित करीत आहेत. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज? आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! थकबाकीबाबतही उत्सुकता

Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

SCROLL FOR NEXT