नाशिक

बंद पथदिवे, पाणीगळतीवरून प्रशासनाला धारेवर

CD
सेकंड मेन (महापालिकेच्या इमारतीचा फोटो वापरावा) --- बंद पथदीप, पाणीगळतीवरून प्रशासनाला धरले धारेवर स्थायी समितीत ‘बीव्हीजी’च्या कामकाजावर नाराजी; मालमत्ता करवसुलीचा घेतला आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : शहरातील पाणीगळती, बंद पथदीप, बीव्हीजी कंपनीच्या कामकाजातील त्रुटी आणि प्रलंबित विषयांवरील कार्यवाहीवरून स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. दिवाळीचा सण जवळ आला असताना अनेक रस्ते अंधारात असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ आश्वासने आणि कारणे देण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यवाही करून पुढील सभेत प्रत्येक विषयाचा अहवाल सादर करा, असे स्पष्ट निर्देश सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाला दिले. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, संजय राऊत, मुख्य लेखाधिकारी विजय सोनवणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील सहा प्रशासकीय विषयांसह विविध नागरी समस्यांवर चर्चा झाली. मागील महिन्यातील न्यायप्रविष्ट प्रकरणांची माहिती आणि प्रभाग समिती एक ते चारमधील मालमत्ता करवसुलीचाही आढावा घेण्यात आला. ‘बीव्हीजी’च्या कामावर प्रश्नचिन्ह शहरातील कचरा संकलनाचे काम व्यवस्थित होत नसल्याचा मुद्दा स्थायी सदस्य विष्णू भंगाळे, ॲड. दिलीप पोकळे यांच्या अन्य सदस्यांनी उपस्थित केला. बीव्हीजीच्या कामकाजासंदर्भात नियुक्त चौकशी समितीच्या प्रस्तावावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, सभेत प्रश्न उपस्थित करूनही त्यावर कार्यवाही होत नसेल, तर इतिवृत्त मंजूर करण्याचा उपयोग काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. कंपनीच्या वाहनांचे तसेच महापालिकेच्या वाहनांचे तपासणी अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पथदिवे, पाणीगळतीकडे दुर्लक्ष? शहरात ठिकठिकाणी पाणीगळती होत असून, पगारिया ऑटो परिसरात बाहेरील नागरिक पाणी भरत असल्याचा मुद्दाही सभेत मांडण्यात आला. पथदीप बंद असल्याचा मुद्यावरून सदस्यांनी संताप व्यक्त केला. चौकट करदात्यांना दिलासा देण्याची मागणी पिंप्राळा परिसरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी रामानंदनगर येथे जावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी निदर्शनास आणले. परिसरातच कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र वसुली पथक नेमण्याची मागणी करण्यात आली. वसुली कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याची सूचनाही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT