नाशिक

वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मिठाईवाटप

CD
NSK26H34610 जळगाव : वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मिठाईवाटप कार्यक्रमांत उपस्थित मान्यवर. वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मिठाईवाटप वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशनतर्फे ‘स्नेहमिलन’ उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : दरवर्षाप्रमाणे जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे गुरुवारी (ता. ५) वृत्तपत्र वाटप करणारे व वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन व मिठाईवाटप कार्यक्रम सायंकाळी केमिस्ट भवन येथे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विशाल भोळे, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष सुनील भंगाळे, जैन उद्योग समूहाचे मीडियाप्रमुख अनिल जोशी, शिवसेना जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख श्‍याम कोगटा हे उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. श्री. जोशी यांनी मार्गदर्शन केले व मंडळास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोपाळ चौधरी यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच या कार्यास अनेक वर्षांपासून उपस्थित मान्यवरांसह ‘गुजरात स्वीट’चे संचालक नीलेश मदानी योग्य ती मदत करीत असल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी सुनील भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फाउंडेशनतर्फे अध्यक्ष प्रा. नितीन चौधरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी प्रा. नितीन चौधरी, रवींद्र जोशी, विलास वाणी, भालचंद्र वाणी, अनिल पाटील, वसंत गायकवाड, उपाध्यक्ष विशाल वाणी, संजय चौधरी सचिव विजय कोतकर, अर्जुन पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले. यशस्वितेसाठी मंडळाचे तुषार चौधरी, महेश सोनार, हरीश चौधरी, दिनेश वाणी, हिरालाल टेकावडे, किशोर साळुंखे, राकेश सोनार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur News: अंगणवाडी सेविका अंजली तूपलोंढे यांच्या निधनाने हळहळ; आमदार प्रशांत बंब यांनी कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन

SCROLL FOR NEXT