नाशिक

घरफोड्यांच्या धास्तीने श्यामनगरवासीय उतरले रस्त्यावर

CD
टुडे ३, मेन फिचर NSK26H35270, NSK26H35271 जळगाव : श्यामनगर परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालताना नागरिक. ........ घरफोड्यांच्या धास्तीने श्यामनगरवासीय उतरले रस्त्यावर रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नागरिकांची स्वयंस्फूर्त गस्त; चार ते पाच जणांचे गट करून पहारा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये शहरातील घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी गिरणा पंपिंग रोड परिसरातील श्यामनगरात सलग तीन दिवस घरफोडीच्या घटना घडविल्या. एकाच परिसरात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पोलिसांच्या गस्तीवर अवलंबून न राहता, आता श्यामनगरवासीयांनी स्वतःच आपल्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. मंगळवारी (ता. १७) झालेल्या बैठकीनंतर नागरिकांनी रात्रीच्या वेळी स्वयंस्फूर्त गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप आणि कड्या तोडून घरफोड्या केल्या. सलग तीन दिवस या घटना उघडकीस आल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांकडूनही रात्रीच्या वेळी परिसरात गस्त सुरू करण्यात आली आहे. चार तास पहारा मात्र, वाढत्या घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. ''आपल्या घराचे आणि परिसराचे संरक्षण आपल्यालाच करावे लागेल'', या भूमिकेतून मंगळवारी परिसरातील नागरिकांची बैठक झाली. त्यात रात्रीच्या वेळी सामूहिक गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चार ते पाच नागरिकांचे गट तयार करण्यात आले असून, रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत हे गट आलटून-पालटून परिसरात जागता पहारा देत आहेत. चौकट अन्य परिसरात गस्तीचे आवाहन दरम्यान, केवळ श्यामनगरपुरती ही मोहीम मर्यादित न ठेवता याच परिसरातील सहजानंदनगरसह अन्य आजूबाजूच्या कॉलन्यांमधील रहिवाशांनीही रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. पोलिसांच्या गस्तीला नागरिकांच्या सतर्कतेची जोड मिळाल्यास चोरट्यांना आळा घालण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : शायना एनसीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबई प्रेस क्लब बाहेर निदर्शनं

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT