नाशिक

जिल्ह्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम

CD
सेकंड मेन NSK26H31331 जळगाव : दारु भट्ट्या उद्ध्वस्त करताना पोलिस पथके. अवैध दारुविरोधात पोलिसांची धडक मोहीम जिल्ह्यात एकाच वेळी ठिकठिकाणी छापे; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत ३१ लाख ९५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३७ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यात विवीध तालूक्यांमध्ये हातभट्ट्या उद्ध्वस्त, मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अमंलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे, दारू विक्रीची ठिकाणे, साठवणूक केंद्रे आणि अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अचानक छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन, कच्चे साहित्य, तयार दारू व वाहने जप्त करून हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. ग्राफ . दृष्टिक्षेपात कारवाई. - एकूण दाखल गुन्हे : १३७ - एकूण संशयित : १३७ - जप्त गावठी दारू : ४०६९ लिटर - नष्ट रसायन : ४७ हजार ८१६ लिटर - विदेशी/देशी दारू : २३७ नग देशी दारू बाटल्या - एकूण जप्त मुद्देमाल : ३१ लाख ९५ हजार ३६० नऊ महिन्यातील कारवाई - २ हजार ५२२ संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत - एकूण २५०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माहिती देण्याचे आवाहन माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराजला मात्र पहिल्या कसोटीतही बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

SCROLL FOR NEXT