टुडे ४ सेकंड मेन
---
(संबंधित संग्रहित चित्र वापरावे)
शहरातील अनेक भागांत विजेचा लपंडाव
दिवसा, रात्री-अपरात्री ‘बत्ती गूल’; नागरिकांना मनस्ताप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : शहरातील अनेक भागात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्री-अपरात्री केव्हाही वीज ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला ताप आला आहे. तसेच रायसोनी नगर भागात गेल्या दोन-तीन महिन्यापासून विजेचा दाब-कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या घरातील विजेची उपकरण खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
जळगावातील काही भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून विजेचा लंपडाव होत आहे. दिवसा तसेच रात्री-अपरात्री केव्हाही वीज जाण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. त्यामुळे वीज ये-जा करत असल्याने महिला वर्गाला याचा जास्त त्रास होत आहे. त्यात ऐन सायंकाळी अंधार पडल्यावर वीज जास्त वेळा जात असल्याने महिलांची धावपळ होत आहे.
‘ऑक्टोबर हीट’मुळे भार
जळगाव शहरातील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले गेले असून दुपारच्या वेळी उष्णतेचा परिणामही वाढला आहे. अशा वातावरणात पंखे, कुलर आणि वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढतो. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यास घरगुती कामकाजावर थेट परिणाम होत आहे.
बाजारपेठेतही समस्या
शहरातील बाजारपेठ परिसरातही गेल्या काही दिवसांपासून दुपारी तसेच सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढत असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी दुरुस्तीची कामे शक्यतो नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.
चौकट
रायसोनीनगरमध्ये वीजदाबाचा चढ-उतार
रायसोनीनगर परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वीजदाबात सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजदाब कधी कमी तर कधी अचानक वाढत असल्याने घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज तसेच अन्य विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत काही नागरिकांच्या घरातील पंखे दोन ते तीन वेळा जळाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उपकरणे दुरुस्त करून घेण्याचा किंवा नवीन उपकरणे खरेदी करण्याचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडत आहे. त्यामुळे परिसरातील वीजवाहिन्या, रोहित्र आणि वीजदाबाची तांत्रिक तपासणी करून समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.