नाशिक

शालेय मनपा योग स्‍पर्धा

CD
शालेय मनपा योग स्‍पर्धेत नियमबाह्य निवड (उपशीर्षक) डॉ. अनिता पाटील यांची क्रीडा आयुक्‍तांकडे तक्रार; अपात्र खेळाडूंनी बाद करण्याची मागणी सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ४ : जळगावात नुकत्याच झालेल्‍या शालेय मनपास्‍तरीय योगासन स्‍पर्धेत नियमबाह्य पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली. राज्‍य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी पदाचा दुरुपयोग करत नियमबाह्य निवड करण्यात आल्‍याचा आरोप जळगाव जिल्‍हा योग असोसिएशनच्‍या सचिव डॉ. अनिता पाटील यांनी केला असून डॉ. पाटील यांच्‍यासह पालकांनी याबाबत राज्‍याच्‍या क्रीडा आयुक्‍तांसह जिल्‍हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली आहे. जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्‍हा क्रीडा संकुलात या योगासन स्‍पर्धा १ नोव्‍हेंबरला झाल्‍या. यात आर्टिस्टिक पेअर या क्रीडा प्रकारात एकाच शाळेच्‍या दोन खेळाडूंना सहभागी करून दुसऱ्या शाळेतील खेळाडूंसोबत स्‍पर्धा होणे अपेक्षित आहे. परंतु, दोन वेगवेगळ्या शाळांमधील खेळाडूंनी एकत्र सहभागी करून नियमबाह्य जोडी तयार केल्‍याचे डॉ. पाटील यांच्‍या तक्रारीत म्‍हटले आहे. तसेच १९ वर्षाखालील मुलींच्‍या वैयक्तिक प्रकारात निकाल जाहीर झाल्‍यानंतर चंचल माळी यांनी निकालात फेरबदल करून गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्‍या ध्रुवी बडाले या खेळाडूला डावलून स्‍वतःच्‍या कोचिंगमधील खेळाडूला विजयी घोषित केले. याबाबत पालक राहुल कोटेचा यांनी स्‍पर्धेच्‍या ठिकाणीच तक्रार केली होती. दरम्‍यान, चंचल माळी यांनी आपल्‍या पदाचा गैरवापर केला असून नियमबाह्य निवड रद्द करावी, अपात्र खेळाडूंना स्‍पर्धेतून बाद करावे. तसेच राज्‍य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांची विभागीय चौकशी करून त्‍यांची तात्‍काळ बदली करण्याची मागणी डॉ. अनिता पाटील यांनी केली आहे. ––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT