NSK26H31407
जळगाव : अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद हारकर यांना निवेदन देताना दिलीप गवळी. शेजारी विलास जुनागडे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व सुनील पालवे.
––––
विभागीय संकुलात रायफल शूटिंगच्या तिन्ही रेंजेस उभारा
(उपशीर्षक)
जिल्हा रायफल असोसिएशनचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : येथे उभारण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलात १० मीटरसह २५ मीटर आणि ५० मीटर अशा तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व अत्याधुनिक रायफल शूटिंग रेंजेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद हारकर यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संघटनांची सभा पार पडली. या सभेनंतर रायफल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी हे निवेदन दिले. यावेळी जिल्हा क्रीडा संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, रायफल असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, सहसचिव सुनील पालवे, खजिनदार विलास जुनागडे, तसेच क्रीडा महासंघाचे सचिव डॉ. प्रदीप तळवलकर आदी उपस्थित होते.
जळगावला मोठी संधी
सध्या महाराष्ट्रात २५ मीटर व ५० मीटरच्या शूटिंग रेंजेस केवळ मुंबई, पुणे आणि कोल्हापूर याच ठिकाणी उपलब्ध आहेत. जळगावच्या विभागीय क्रीडा संकुलात १० मीटर सोबतच २५ व ५० मीटरच्या रेंजेस तयार झाल्यास जळगावसह संपूर्ण खानदेश व मध्य प्रदेशातील युवा खेळाडूंना सरावासाठी व्यासपीठ मिळेल.
चौकट
खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध झाल्यास स्थानिक खेळाडूंच्या गुणांना वाव मिळून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी प्राप्त होईल, असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
–––––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.