नाशिक

महामार्गाने पुन्हा गिळला एका कुटूंबीयांचा आधार

CD
मेन फिचर (ही बातमी सिंगल पट्टा खाली घेऊन पाच कॉलम घ्यावी, याबातमीच्या शेजारी तीन कॉलम साईड स्टोरीची जागा सोडावी) ---- NSK26H32463 : रवींद्र चौधरी NSK26H32464 : अपघातस्थळावर मदतकार्य करताना पोलिस व दाखल झालेली रुग्णवाहिका. --- NSK26H32465 : पोलिसांनी ताब्यात घेतलेला हाच तो अवजड ट्रक. --- सुसाट ट्रकने घेतला दुचाकीस्वाराचा बळी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच काळाची झडप; आकाशवाणी उड्डाणपुलावर अपघात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास सुसाट ट्रकने दुचाकीस्वारास वाहनासह चिरडल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५, मूळ रा.उत्राण, ता.एरंडोल, ह. मु. चंदूअण्णानगर, जळगाव) यांच्या पोटावरुन ट्रकचे चाक गेल्याने मृत्यू झाला. घटनास्थळावरुन प्राप्त माहितीनुसार, जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शहरातील आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलावर सुसाट ट्रक (आरजे) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता बेजबाबदारपणे ट्रक चालवून दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना सकाळी दहाला घडली. या अपघातात दुचाकीसह चालक ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडले. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. आज गुरुवारी (ता.१५) सकाळी ते दुचाकीने (एमएच १९, डीएन १२८२) बँकेत कामासाठी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गाने शहरात येताना आयटीआयजवळून ते उड्डाणपुलावरुन आकाशवाणी चौकाच्या दिशेने जात होते. उड्डाणपुलावर असताना (आरजे ५० जीए ९२३४) या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांची धाव जवळच आकाशवाणी चौकाजवळ आंदोलनस्थळी असलेल्या पोलिसांना अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. वाहतूक निरीक्षक मोरेश्वर पेंदाम घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ, रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. अपघात घडल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक जागच्या जागी थांबली होती. वाहतूक पोलिसांनी यावेळी वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक ताब्यात अपघाताला कारणीभूत ट्रकवरील चालकास पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रक जिल्‍हापेठ पोलिसांत आणण्यात आले. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आधार हरपला रवींद्र चौधरी यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या अचानक अपघाती मृत्युमुळे चौधरी कुटुंबाचा आधार हरपला आहे. चौकट कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश अपघाताची बातमी समजताच रवींद्र यांच्या कार्यालयात कार्यरत सहकारी व अधिकारी यांनी अपघातस्थळ पाठोपाठ रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांना अपघाताची माहिती कळविण्यात आल्यानंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी केली होती. आपल्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांची डोळी पाणवली असतानाच कुटुंबीयांवर या घटनेचा मोठा आघात होऊन कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT