नाशिक

जिल्ह्यातील ५०० शाळांची वेतन देयके प्रलंबित

CD
जिल्ह्यातील ५०० शाळांची वेतन देयके प्रलंबित उपशीर्षक शिक्षक वेतनाविना; शिक्षणाधिकारी लॉगिनचा टॅब बंद असल्याने अडचणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबरच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सप्टेंबरची वेतन देयके अद्याप अदा झाली नसून, जिल्ह्यातील सुमारे ३५० माध्यमिक व उच्च माध्यमिक, तसेच वंचित व अंशतः अनुदानित, अशा एकूण सुमारे ५०० शाळांची वेतन देयके वेतन पथकाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिली. काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक, संचमान्यता आदी तांत्रिक अडचणी असल्याने संबंधित वेतन देयके प्रथम शिक्षणाधिकारी लॉगिनवर मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणाधिकारी लॉगिनमधून मंजुरी मिळाल्यानंतरच ही देयके वेतन पथकाकडे मंजुरीसाठी सादर केली जातात. मात्र, सप्टेंबरपासून राज्यातील शिक्षणाधिकारी मंजुरीचा संबंधित टॅब बंद असल्याने जळगाव जिल्ह्यातील उर्वरित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अंशतः अनुदानित शाळांची वेतन देयके शिक्षणाधिकारी लॉगिनवर फॉरवर्ड होत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आमदारांना निवेदन या प्रश्नाकडे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने गांभीर्याने लक्ष वेधले असून, सुनील गरुड, समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, डॉ. मिलिंद बागूल यांच्या माध्यमातून शिक्षक आमदार किशोर दराडे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या सहकार्याने राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, ज्या शाळांची वेतन देयके सध्या वेतन पथकाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, त्यांना कोणतीही विलंबाची कारणे न ठेवता तातडीने मंजुरी देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा करावे, अशी मागणी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी केली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी निगडित असून, तांत्रिक अथवा प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये. त्यामुळे प्रलंबित वेतन देयकांना तातडीने मंजुरी देऊन वेतन वितरणाची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. --- कोट सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे वेतन प्रलंबित राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने शिक्षणाधिकारी लॉगिनचा बंद असलेला टॅब तत्काळ उपलब्ध करून द्यावा आणि प्रलंबित वेतन देयकांना तत्काळ मंजुरी देऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे. - तुळशीराम सोनवणे, समन्वयक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT