नाशिक

दोन सिंगल कॉलम

CD
मालवाहू वाहनाला कारची धडक जळगाव : समोरून भरधाव येणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कानळदा-जळगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ घडला. अपघातानंतर जखमी चालकाला मदत न करताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी गुरुवारी (ता. ६) गुन्हा दाखल झाला आहे. इब्राहीम रहीम पिंजारी (वय ३६, रा. डी. मरियम पार्क, शिवाजीनगर, जळगाव) हे मालवाहू वाहन (एमएच १९ बीएम १९०४) घेऊन कानळदा येथून जळगावकडे येत होते. कानळदापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंपाजवळ समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०५ सीए ३१२३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक पसार झाला. नागरिकांनी जखमी पिंजारी यांना वाहनातून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमीचे भाऊ सलमान रहीम पिंजारी (वय ३८, रा. मरीयम पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---------------------- मधमाश्‍यांचा हल्ला; सहा महिला जखमी जळगाव : ममुराबाद (ता. जळगाव) येथे मधमाश्‍यांनी केलेल्या हल्ल्यात सहा महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. ६) ही घटना घडली. मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. जखमी महिलांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात सीमा भगवान पाटील (वय ४०), मंगला कोल्हे (वय ४०), लताबाई पाटील (वय ६०), निंबाबाई राघो पाटील (वय ६०), कल्पना विलास पाटील (वय ३८) आणि अनिता चंद्रकांत पाटील (वय ३५, सर्व रा. ममुराबाद) या सहा महिला जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

SCROLL FOR NEXT