नाशिक

‘भोग साहेब’ सोहळ्याला भाविकांची मांदियाळी

CD
टुडे २, सेकंड मेन ---- NSK26H34155 जळगाव : वर्सी महोत्सवात भाविकांची झालेली गर्दी. ------------- NSK26H34156 संतांच्या मूर्तीचे दर्शन घेताना भाविक. ----------- ‘भोग साहेब’ सोहळ्याला भाविकांची मांदियाळी वर्सी महोत्सवात देशभरातून उपस्थिती; ३० हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : कंवर नगरातील पूज्य सेवा मंडळात सुरू असलेल्या संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाचा तिसरा दिवस भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. महोत्सवातील महत्त्वाचा मानला जाणारा ‘भोग साहेब’ सोहळा शुक्रवारी (ता. ३१) मोठ्या श्रद्धेने पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध शहरांतून संत-महात्मे आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दिवसाची सुरुवात पहाटे पाचला संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या देवरी साहेब (समाधीस्थळ) येथे पंचामृत स्नानाने झाली. त्यानंतर भजनांचा कार्यक्रम झाला. सकाळी ११ वाजता ध्वजपूजनाचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी संत बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य भाई देवीदास, अमरावती येथील साई राजेशलाल यांच्यासह देशभरातून आलेले संत-महात्मे, ट्रस्टचे पदाधिकारी, पंचायत पदाधिकारी आणि सिंधी समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, रेश्‍मा काळे, डॉ. रागिणी पाटील, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी आणि महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी महोत्सवाला भेट दिली. ट्रस्टचे अध्यक्ष राम कटारिया, नगरसेवक रमेश मतानी, प्रकाश बालानी, माजी नगरसेवक अशोक मंधान, राजू आडवानी आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. ३० हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद ध्वजपूजनानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ३० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या निमित्ताने जळगावातील अनेक सिंधी समाजबांधवांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. महिला भगिनींसह भाविकांनी सेवाकार्यात उत्स्फूर्त योगदान दिले. भक्तिरसाची अनुभूती सायंकाळी पाचपासून ‘भोग साहेब’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमरावतीचे साई राजेशलाल, मीरा अम्मा चोलेवारी (रायपूर), भाई देवीदास, साई नितिनलाल (अयोध्या), साई किशोरीलाल (सतना), साई अर्जनदास (उल्हासनगर), साई हरीराम (उज्जैन), साई फकीराराम (नागपूर) आणि साई धीरजलाल (अमरावती) यांच्यासह संत-महात्म्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. चौकट दुकाने दिवसभर बंद; कार्यक्रमात सहभाग रात्री आठपासून संत बाबा हरदासराम साहेब आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या जीवनकार्यावर आधारित भजनांचा कार्यक्रम झाला. बाबा हरदासराम पटापटी टोळी, रतन जाधव म्युझिकल पार्टी, लता लालवाणी देवी, धीरजलाल पार्टी यांनी भजनसेवा सादर केली. तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. दरम्यान, शनिवारी दिवसभर सिंधी बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत!" राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; भाजपकडून 'इंडिया' आघाडीच्या मॉक पार्लमेंटवर सडकून टीका

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT