नाशिक

भविष्यातील पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी मांडले निबंधातून..!

CD
पान-३ फोटो २ कॉ फक्त YEO26B27196 जळगाव नेऊर : पाण्यावरील निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करताना पालखेड पाटबंधारे विभागाचे अधिकारी. ३०-२ जलसेवा संकल्प निबंध स्पर्धत सृष्टी ठोंबरे प्रथम ----------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१७ : जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानाअंतर्गत जळगाव नेऊर येथील शाळेत ‘भविष्यासाठी पाण्याचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा झाल्या. यात विद्यार्थ्यांनी पाण्याचे भविष्यातील महत्त्व शब्दबद्ध केले. या स्पर्धत सृष्टी ठोंबरे हिने प्रथम क्रमांक मिळवला. जलसिंचन शाखा, एरंडगाव आणि नेऊरगावच्या अजिंक्यतारा पाणी वापर संस्थेतर्फे स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. तीन विजेत्या विद्यार्थिनींना शालेय भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जळगाव नेऊर येथील शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. पाण्याचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीची गरज याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. बक्षीस वितरणप्रसंगी पालखेड पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. शाखाधिकारी मिलिंद पगार यांनीही पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करून बचत करण्याचे आवाहन केले. ‘मविप्र’चे तालुका संचालक नंदकुमार बनकर यांनी सहकार्य केले. कालवा निरीक्षक बदमोरे आणि सांगळे यांनी विशेष मेहनत घेतली. अजिंक्यतारा पाणी वापर संस्थेचे सचिव देविदास कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. १६-१ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी प्रथम ः सृष्टी विठ्ठल ठोंबरे (नववी), द्वितीय ः आरती अशोक सोनवणे (दहावी), तृतीय ः मयूरी गणेश रसाळ (दहावी). -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, साडे नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

चार वर्षांनंतर भारतात होणार IPL लिलाव? तारीख ठरली, पण त्याच दिवशी IND vs SL सामना... सावळागोंधळ

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT