टुडे १ फ्लायर, जळगावसाठी महत्त्वाचा निर्णय आहे, कृपया ८ कॉलम फ्लायर घ्यावे)
---
(नळाचे संग्रहित चित्र वापरावे)
---
शहरात आजपासून पाणीकपात; पाणीपुरवठ्याची वेळ १५ मिनिटे होणार कमी
वाघूर जलाशयातून पाणीसाठी कमी उचलला जाणार; शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : वाघूर जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारपासून (ता. १७) शहरातील पाणीपुरवठ्याचा कालावधी दीड तासांवरून एक तास १५ मिनिटे करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाण्याच्या उपशात दहा टक्के कपात करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाघूर जलाशयाची एकूण पाणीसाठवण क्षमता २४९.९१८ दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यात १७३.१७९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या सुमारे ७० टक्के आहे. सन २०२६-२७ या पाणी आरक्षण वर्षासाठी जळगाव शहराला ४० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे पाच दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर झाला असून, उर्वरित ३५ दशलक्ष घनमीटर पाणी जून २०२७ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
दररोज ९० ते ९५ दशलक्ष लिटर उपसा
वाघूर जलाशयातून सध्या दररोज सुमारे ९० ते ९५ दशलक्ष लिटर कच्च्या पाण्याचा उपसा केला जात आहे. शहराची शुद्ध पाण्याची दैनंदिन गरज सुमारे ९० दशलक्ष लिटर आहे. सध्या शहरात दोन दिवसांच्या अंतराने, म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पंपिंग यंत्रणा दररोज सुमारे २० ते २१ तास सुरू ठेवावी लागते.
पंधरा मिनिटाची वेळ कमी होणार
पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सध्याच्या दीड तासांच्या पाणीपुरवठ्यात १५ मिनिटांची कपात करण्यात येणार आहे. या उपाययोजनेतून धरणातून पाण्याच्या उपसा करण्यासाठी अपेक्षित पाणी कपात साधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
पुढील टप्यात दिवस कमी होणार
वाघूर जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यास किंवा उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन अधिक कपात आवश्यक ठरल्यास पुढील टप्प्यात पाणीपुरवठ्याच्या अंतरात वाढ करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या दोन दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांच्या अंतराने करण्याची शक्यता आहे.
चौकट
पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
दरम्यान, शहरातील जलवाहिन्यांवरील गळती शोधून तातडीने दुरुस्ती करणे, नळांना तोट्या बसविणे, अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवणे तसेच वाहन धुणे व रस्त्यांवर पाणी मारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.