नाशिक

वाघूरचे पाणी जळगावसाठीच राखा

CD
वाघूरचे पाणी जळगावसाठीच राखा शिवाजी ब्रिगेडची मागणी; क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र व्यवस्था करा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ आणि भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता वाघूर धरणातील जळगावसाठी राखीव पाण्यावर शहराबाहेरील संस्थांचा अतिरिक्त भार टाकू नये, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. शहराबाहेर प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विभागीय प्रशिक्षण क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र जलस्रोत अथवा स्वतंत्र पाणी आरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहराची लोकसंख्या वाढत असताना भविष्यात महानगरपालिका हद्दवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी गरजेबरोबरच पुढील अनेक दशकांचा विचार करून जलनियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. शहरातील नागरिकांसह रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, व्यापारी आस्थापना आणि अन्य नागरी सुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा संकुलाला पाणी देण्यास संघटनेचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यासाठी जळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये. धानवड, भागपूर किंवा अन्य जवळच्या जलस्रोतांचा पर्याय तपासून या दोन्ही संस्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अशोक एस. शिंदे, डॉ. धनंजय बेंद्रे, किरण बोरसे, संजय काळे, धीरज काळे उपस्थित होते. शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला. ठरावाचा पुनर्विचार करा महापालिकेच्या आगामी महासभेत शहराच्या पाणी आरक्षणातून या संस्थांना पाणी देण्यासंदर्भातील ठरावाचा पुनर्विचार करून तो रद्द करावा. तसेच पुढील २५, ५० आणि १०० वर्षांची जळगावची पाणीगरज निश्चित करून त्यानुसार दीर्घकालीन आराखडा तयार करावा, अशी मागणी संघटनेने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT