नाशिक

जळगावात गारवा वाढला; दिवसभर ढगाळ वातावरण उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव; तापमानातील घसरणीमुळे थंडीची चाहूल

CD
(ही बातमी टॉपच्या फोटोच्या बाजूला घ्यावी) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण गारवा वाढला; उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव; तापमान घसरले सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२९ : उत्तरेकडून आणि ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने जिल्ह्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. हवेची हालचाल वाढल्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक गारवा जाणवत असून, तापमानातही घट झाली आहे. गुरुवारी (ता. २९) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत असून, वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. दिवसभर सूर्यप्रकाश कमी असल्याने वातावरणात गारवा टिकून होता. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या दैनंदिन दिनक्रमावरही परिणाम जाणवत आहे. सकाळी घराबाहेर पडताना तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना गारव्याचा अनुभव येत आहे. आगामी काळात वाऱ्यांचा प्रभाव आणि तापमानातील चढ-उतार यामुळे हवामानात आणखी बदल जाणवण्याची शक्यता आहे. चौकट सकाळी थंडी, दुपारी चटका सध्या वाऱ्यांच्या वेगात वाढ झाली असून, रात्री आणि पहाटेच्या तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीचा प्रभाव वाढत आहे. किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले जात असून, आगामी काळात त्यात आणखी चढउतार होण्याची शक्यता आहे. पहाटे व सकाळी तसेच सायंकाळी गुलाबी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT