नाशिक

जळगावच्या तिघा पैलवानांची ग्रॅपलिंग- मलयुद्ध स्पर्धेत बाजी

CD
NSK26H33834 जळगाव : उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्यपदक मिळविणारे जळगावचे पैलवान. ------ जळगावच्या तिघा पैलवानांची ग्रॅपलिंग- मलयुद्ध स्पर्धेत बाजी उपशीर्षक नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उत्तराखंड येथे झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही बाब संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. या यशामागे त्यांचे वस्ताद पैलवान चेतन शिंदे, पैलवान कल्पेश मराठे, पैलवान आशिष ठाकरे आणि पैलवान भैया पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे, सातत्यपूर्ण सरावामुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या तरुण पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले. प्रेरणादायी पाठिंबा आणि सहकार्य जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनामुळे या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT