नाशिक

लिंबू उत्पादक मदतीच्या प्रतिक्षेत

CD
(जागेनुसार कापता येईल) जळगाव जिल्ह्यातील केळी, लिंबू उत्पादक मदतीच्या प्रतिक्षेत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यांना उन्हाळ्यात अनेकदा तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतामधील उभी केळी तर आडवी झालीच शिवाय लिंबूसह मका, ज्वारी, गहू आदी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु भरपाई केव्हा मिळेल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत केळी व अन्य पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या क्रमांकाच्या आधारे संबंधित पोर्टलवरून केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीचा निधी जमा होतो. पण ही केवायसीच होत नाही. केवायसाठी आवश्यक ओटीपी किंवा बोटांचे ठसे येत नाहीत. यामुळे हा नुकसानीचा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याची स्थिती आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश होते. यानंतर पंचनामे झाले. या झालेल्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली. पण नुकसानग्रस्त शेतकरी, पीडितांना आवश्यक सर्व ती मदत मिळालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

Know Your Army Exhibition : शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन; मुंबईकरांना अनुभवता आले लष्करी सामर्थ्य!

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

SCROLL FOR NEXT