नाशिक

आनंद मेळा चालकावर चॉपरने वार

CD
आनंद मेळ्यातील हल्लाप्रकरणी तिघांवर जबरीलुटीचा गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : शहरातील नेहरू चौकात खान्देश सेंट्रलच्या जागेवर सुरू असलेल्या मेळ्यात एका तरुणावर तिघांनी खंडणीसाठी चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मेळावाचालक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्याजवळील दीडहजार रुपये हिसकवण्यात आले आहेत. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. शहरातील उस्मानिया पार्क येथील रहिवासी अरबाज शकील शेख हसन (वय २६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हा नेहरु चौकाजवळील खान्देश सेंट्रलच्या जागेत आनंद मेळावा चालवतो. गुरुवारी (ता.१२) रात्री ९ ते ९:१५ वाजेच्या सुमारास तो लोकांकडून तिकिट तपासून मेळ्यात सोडत असताना काही तरुण तेथे आले व त्यांनी खंडणीची मागणी करून शिवीगाळ केली. तसेच संशयित सागर हिरामण कोळी व इतर दोन जणांनी मिळून मेळ्याच्या ठिकाणी फिर्यादीच्या डाव्या कानामागे मारहाण केली. चौकट चॉपरने हल्ला संशयितांनी अरबाजच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरी काढून घेतले. तसेच मेळावा पाहण्यासाठी आलेला मो. अनस खान खलील खान यांनाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. या हल्ल्यात अरबाजच्या डाव्या कानाजवळ चॉपरने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी जखमीच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात संशयित सागर हिरामण कोळी (वय २४, रा. उज्ज्वल चौक, कांचननगर, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT