नाशिक

हॉकी मैदानावर विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचा दबदबा

CD
NSK26H32245 जळगाव : महापालिका आंतरशालेय हॉकी स्‍पर्धेतील तिन्ही संघातील खेळाडूंसोबत फारुक शेख, किशोर चौधरी, छाया चिरमाडे, उदय फालक आदी. ----------- ‘मनपा’ आंतरशालेय हॉकी स्‍पर्धेत विद्या इंग्लिश स्कूल, मू.जे.विजयी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय महानगरपालिका जिल्हास्तरीय मुलींच्या हॉकी स्पर्धेत खेळाडूंनी दमदार व रोमांचक खेळाचे प्रदर्शन केले. यात १४ व १७ वर्ष वयोगटात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, तर १९ वर्ष वयोगटात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकाविले. आंतरशालेय स्पर्धेचे उद् घाटन व पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक तथा हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे किशोर चौधरी, हॉकी जळगावचे ॲड. आमिर शेख, इम्रान बिस्मिल्ला, बेंडाळे व गोदावरी महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका छाया चिरमाडे व स्नेहल कोल्हे, उदय फालक, आकाश सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य पंच म्हणून इम्रान बिस्मिल्ला, सहपंच इक्बाल पिंजारी, शहबाज पिंजारी व गौरव सोनवणे यांनी कामगिरी पार पाडली. स्‍पर्धेतील विजेते असे १४ वर्ष मुलींचा संघ विजेता : विद्या इंग्लिश मीडियम स्कूल १७ वर्ष विजेता : विद्या इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता : गोदावरी स्कूल १९ वयोगट मुली विजेता : मूळजी जेठा महाविद्यालय उपविजेता : बेंडाळे महिला महाविद्यालय

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT