नाशिक

दुचाकीसह गटारीत कोसळून तरुणाचा मृत्यु

CD
NSK26H31477 : नवल सोनवणे ----------- दुचाकीसह गटारीत कोसळून तरुणाचा मृत्यू ---- कंत्राटदाराच्या निष्काळीपणाचा बळी गेल्याचा कुटुंबीयांकडून आरोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : मेहरुण भागातील छत्रपती शिवाजी उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकीसह कोसळल्याने नवल अर्जुन सोनवणे (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) दुपारी घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळेच बळी गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. सोनवणे चटई कंपनीत कामाला होते. सोमवारी दुपारी मेहरुणमधून काम आटोपून दुचाकीने घरी येत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात नवीन रस्त्यावरून जाताना नवीन बांधलेल्या गटारीचे काम अपूर्ण होते. गटारीवर ढापाही टाकलेला नव्हता. सोनवणे यांना उघड्या गटारीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट गटारीच्या ब्लॉकमध्ये जाऊन अडकली. यामुळे सोनवणे थेट डोक्यावर आदळले व गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता व गटारीचे काम सुरू असताना, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेतली नव्हती. उघड्या गटारीभोवती कोणतेही संरक्षण किंवा धोक्याची सूचना देणारा फलकही लावला नव्हता. गटारीवर सुरक्षेसाठी कल्व्हर्ट टाकले असते किंवा किमान सूचना फलक असता, तर सोनवणे यांचा जीव वाचला असता, असे नातेवाइकांनी सांगितले. सोनवणे यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकासंह परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली. रामेश्वर कॉलनीतही या घटनेने शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT