नाशिक

महासभेतील पिस्तूलप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

CD
महासभेतील पिस्तूलप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष व्हिडिओ व्हायरल; नगरसचिव विभाग नियम तपासणार? सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : जळगाव महापालिकेच्या शुक्रवारी (ता. ९) झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या कमरेला पिस्तूल असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. महापालिकेच्या महासभेत महापौर पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. या प्रकरणाबाबत महापौरांकडूनही प्रशासनाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती आहे. दरम्यान, महासभेच्या सभागृहात शस्त्र बाळगण्यासंदर्भात नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची पडताळणी होण्याची शक्यता आहे. यासाठी नगरसचिव विभागाकडून महासभेची नियमावली तपासली जाऊ शकते. नियमावलीत अशा प्रकाराबाबत कोणत्या तरतुदी आहेत आणि संबंधित घटनेत त्यांचे उल्लंघन झाले आहे का, हे तपासल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय होऊ शकतो. कोट महासभेत नगरसेवकाच्या कमरेला पिस्तूल असल्याचे व्हिडीओ सोशल माध्यमावर पाहिला मात्र याबाबत तक्रार नाही. महासभेचे पिठासीन अधिकारी म्हणून महापौर असून त्यांच्याकडून काही सूचना नाही. - आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका. ..... कोट काही घटनांमुळे मला स्वःरक्षणासाठी हे शस्त्र बाळगण्याचा परवाना प्रशासनाकडून मिळालेले आहे. महासभेत हे शस्त्र आणण्याचा कोणताही वाईट उद्देश नसून स्वःताच्या रक्षणासाठी हे शस्त्र कायम बाळगावे लागते. - संतोष पाटील. नगरसेवक. .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT