NSK26H35323
जळगाव : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र प्रभारी हिंमत सिंग, जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव आदी.
--------
ठाण्यातील रॅलीत हजारो कार्यकर्ते जाणार
---
जळगावातील काँग्रेसच्या बैठकीत नियोजनाबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संविधान बचाव रॅलीत जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याबाबत येथे बुधवारी (ता. १८) झालेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव अध्यक्षस्थानी होते.
या वेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी हिंमत सिंग, जळगाव लोकसभा प्रभारी लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा प्रभारी ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हरून नदवी, चाळीसगाव प्रभारी हरीश रावल, पाचोरा प्रभारी भालचंद्र पाटील, माजी प्रदेश सचिव ॲड. सलीम पटेल, ज्योत्स्ना विसपुते, सुभाष पवार, विजय वाणी, जिल्हा सरचिटणीस विजय कासोदे, राहुल बाहेती जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील संघटनात्मक वाढीसह विविध सेल, आघाड्यांच्या नियुक्त्या, जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष यांच्या कार्याची समीक्षा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
हिंमत सिंग यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की, जळगाव जिल्ह्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.जळगाव लोकसभा प्रभारी घुमरे यांनी सर्व ब्लॉक अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हा प्रभारी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. विजय कोसोदे यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर महाजन यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.