नाशिक

जनआक्रोश मोर्चामुळे शहर वाहतुकीत बदल

CD
जनआक्रोश मोर्चामुळे शहर वाहतुकीत बदल उपशीर्षक : दुपारी बारापासून आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्ग बंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवारी (ता. ४) दुपारी दोनला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टळून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक यांनी पूर्वतयारी बैठकीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रविवारी (ता. ४) दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आकाशवाणी चौकाकडून न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस : आकाशवाणी चौक, कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकुळ स्विट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्स, न्यायालय चौक. न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस : न्यायालय चौक, शाहू कॉम्प्लेक्स, गोकुळ स्विट मार्ट, रिंगरोड, कवयित्री बहिणाबाई उद्यान, आकाशवाणी चौक. नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने : नेरी नाका, पांडे चौक, सिव्हिल हॉस्पिटल, बेंडाळे चौक, चित्रा चौक, न्यायालय चौक. प्रभात चौकाकडून नेरी नाका / न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने : प्रभात चौक, कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकुळ स्वीट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्स, न्यायालय चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका. चौकट नागरिक व वाहनधारकांना आवाहन मोर्चाच्या कालावधीत नागरिकांनी व वाहनधारकांनी वरीलप्रमाणे दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच अनावश्यकपणे मोर्चाच्या मार्गावर वाहने आणू नयेत आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव पोलिस प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT