शहर टुडे पान चारसाठी
-------------------
NSK26H31473 व NSK26H31471
जळगाव : महात्मा गांधी व्यापारी संकुला(मार्केट)जवळील हॉकर्सच्या गाड्या जप्त करताना महापालिकेतील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक. दुसऱ्या छायाचित्रात रिंगरोडवर लावलेले फलक कापून काढताना महापालिकेचे कर्मचारी.
------------------------------
शहरातील रस्ते हॉकर्सच्या विळख्यात
-------------
गांधी संकुलात ७ हातगाड्या जप्त; रिंगरोडसह गणेश कॉलनीत ३५ फलके हटविली
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांवर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः दररोज प्रत्येक रस्त्यावर नव्याने हॉकर्सची भर पडत असल्याने रस्त्यांची उपलब्ध जागा कमी होत आहे. त्यातून वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारी (ता.५) पुन्हा एकदा कारवाईचा धडाका सुरू केला. महात्मा गांधी व्यापारी(मार्केट) संकुलातूून सात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. रिंगरोड व गणेश कॉलनी परिसरातील ३५ अनधिकृत फलले थेट कापून हटविण्यात आली.
महापालिकेचे पथक सकाळी दहाच्या सुमारास गांधी संकुलात दाखल झाले. गजबजलेल्या बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला व वाहतुकीच्या मार्गात हातगाड्या लावून व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या सात हातगाड्या थेट जप्त करीत महापालिकेच्या वाहनात टाकण्यात आल्या. दुसऱ्या पथकाने शहरातील अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली. न्यायालय चौकापासून संपूर्ण रिंगरोड व गणेश कॉलनी रस्त्यावरही कारवाई करण्यात आली. दुकानांसमोर उभारलेले, वाहतुकीस व दृश्यतेला अडथळा ठरणारे अनधिकृत फलक थेट कापून काढण्यात आले. या मोहिमेत ३५ फलक जप्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.