नाशिक

ठरलेल्या वेळेतच पाणीपुरवठा करा

CD
ठरलेल्या वेळेतच पाणीपुरवठा करा महापौरांचे आदेश; व्हॉव्हमनच्या मनमानीवर कारवाई करा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, जळगाव महापालिकेच्या काही प्रभागांमध्ये संबंधित व्हॉव्हमनकडून सकाळपासून पाणीपुरवठा सुरू ठेवला जात असून, निर्धारित वेळेत तो बंद केला जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने महापौर दीपमाला काळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात महापौरांनी पत्राद्वारे संबंधित यंत्रणेला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी महापौर कार्यालयात प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे वारंवार तक्रारी केल्या आहेत. संबंधित व्हॉलमनना दूरध्वनीवरून सूचना देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारीही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. चौकट ‘प्रभागांत जाऊन पाहणी करा’ शहरात पाणीटंचाई असताना एका भागात अनावश्यक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवल्याने पाण्याचा अपव्यय होतो, तर दुसऱ्या भागातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व प्रभागांतील व्हॉव्हमनना निर्धारित वेळेतच पाणीपुरवठा सुरू व बंद करावे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी विविध प्रभागांत जाऊन पाहणी करावी, अशा सूचना महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT