मेनफिचर
शहर टुडे पान तीनसाठी
--------------------
लोगो : आम्ही साऱ्या जणी/ महिला व बालविकास विभाग
------
NSK26H31956
जळगाव : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील कर्मचारी.
-------
माता-बालकांसाठी केलेल्या कामाचा आनंदच
--------
नवरात्रोत्सवानिमित्त महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.११ : शहरी भागात गरोदर व प्रसूतीनंतर महिलांकडून काही प्रमाणात काळजी घेतली जाते. तुलनेत ग्रामीण भागात फारशी काळजी नसते. मुळात मुलांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास होण्याच्या काळातच लक्ष दिले जात नाही. अशा भागात जावून गरोदर माता, बालकांच्या आहाराबाबत विशेष लक्ष दिले जाते. अर्थात ग्रामीण भागात जावून महिला व बालकांसाठी केलेल्या कामातून मिळणारे समाधान नक्कीच मोठे असते, अशी भावना महिला व बालविकास विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केली.
-------
संपदा संत (बालविकास प्रकल्प अधिकारी) : मुलांसाठी अंगणवाडीमार्फत विकास योजना, पोषण आहार, महिलांसाठी लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवून प्रामुख्याने आमचे काम चालते. कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल करून कुपोषण कमी करण्याचे काम करतो. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, बालविवाह थांबविणे या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळत कुटूंबाचीही जबाबदारी सांभाळतो. यातून होणारी कसरत व काम करतानाचा आनंद तितकाच वेगळा असतो.
------
अर्चना ढामोरे (सुपरवायझर, आयसीडीएस) : गरोदर माता व बालकांच्या पोषणासाठी काम करते. अर्थात महिला व मुलांच्या आयुष्यासाठी निगडीत काम करण्याचे भाग्य मानतो. तांड्यावर अनेकदा मुली नकोशा वाटतात. या गोष्टींकडे बारकीईने लक्ष असते. जामनेर तालुक्यात असे प्रकार होताना रोखले. तीन मुलींना वाचवून चांगल्या कुटूंबात दिले. दैनंदिन कामाव्यतिरिक्त वेगळे काम करता येते. समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून काम करण्याचा आनंद वेगळा असतो.
------
दीपाली चौधरी (मदतनीस) : अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. झोपडपट्टी भागात अंगणवाडी असल्याने काम करताना अडचणी येतात. यातून मार्ग काढत गरोदर माता व बालकांसाठी काम करते. दीड महिन्याच्या बालकाला लस देण्यासाठी त्याचीच आई दारूची नशा करून आली. तिला थोडी ताकीद देत बाळावर काय परिणाम होईल, याची जाणीव करून देत समुपदेशन केले. तत्यामुळे तिने दारू पिणे सोडले. अशा कामातून मिळणारे समाधान मोठे आहे.
------
शालिनी महाजन (जिल्हा समन्वयिका) : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात महिला व बालकांशी संबंधित काम सांभाळते. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडी पातळीवरून भरली जात असलेली माहिती अपडेशन करण्याचे काम करते. हे करताना लहान बालकांच्या काळजीपोटी काम जबाबदारीने सांभाळावे लागते.
------
आरती आशर (जिल्हा समन्वयिका) : अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांना दिला जाणारा नाश्ता, हॉटपॉट मिल्क यावर मॉनेटरिंग करून माहिती पोषण ट्रॅकरवर अपडेट ठेवावी लागते. काही वेळेला अंगणवाडी बंद असली तर त्याबाबत आवर्जून विचारणा करते. काम जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बसून असले तरी ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने काळजीपूर्वकच करते.
----
दुर्गा उमरे (अंगणवाडी पर्यवेक्षिका) : अंगणवाडी सेविका म्हणून ३० वर्षांपासून काम पाहत आहे. कोणत्याही महिला व बाळासाठी एक हजार दिवसांचा कालावधी महत्त्वाचा मानला जातो. अर्थात महिला गरोदर राहिल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतचा हा कालावधी आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या काळात ८० टक्के मेंदूचा विकास होतो. या काळात त्याची काय काळजी घ्यायची? याबाबत प्रत्यक्ष भेटी घेऊन मार्गदर्शन करावे लागते. जिथे कोणी पोहोचू शकत नाहीत, म्हणजेच घरातये पोहोचण्याचे काम आम्ही करतो.
--------
अनिता तिडके (सांख्यिकी सहायक) : जिल्ह्यात १९ प्रकल्पांअंतर्गत अंगणवाडीचे काम चालते. गरोदर माता व बालकांसाठी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. दुसरीकडे आमच्या विभागाशी संबंधित खूप पदे रिक्त आहेत. सात-आठ वर्षांपासून पदभरती नाही. कामाचा ताण असल्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. तरीही कोणालाही लाभापासून वंचित ठेवत नाही.
-------
भारती गुरव (सांख्यिकी सहायक) : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठीच्या लेक लाडकी योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक मुलींच्या खात्यावर पहिल्या हप्त्याचा निधी जमा केला. समाज हा कुटुंबापासून सुरू होत असल्याने मुलांना घरातून संस्कार मिळायला हवे. काही प्रमाणात अंगणवाडीसेविका हे काम करतात.
------
पुष्पलता मराठे (अंगणवाडी सेविका) : झोपडपट्टीत अंगणवाडी असल्याने काम करताना अडचणी येतात. अशातही बालसंगोपन योजनेसाठी तेथील महिलांना पुढे आणले. यापलिकडे जावून कर्करोगग्रस्त महिलेच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन परिसरात फिरून निधी संकलित करून पाच हजार रुपये महिलेला मिळवून देण्याचे काम केले. यातून वेगळा आनंद मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.