नाशिक

अपहरणाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

CD
पिंप्राळ्यातून वृद्ध, मेहरुणचा प्रौढ, रामेश्वर कॉलनीतून तरुणी बेपत्ता अपहरणाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : शहरातील विविध भागातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी अपहरणाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. हनुमान नगर (मेहरुण) येथून सचिन लक्ष्मण वंजारी (वय ४०) हे २९ सप्टेंबरला घरातून अचानक निघून गेले. पिंप्राळा गुरुदत्त नगरातील रहिवासी प्रमोदसिंग जयसिंग राजपूत (वय ६१) ३ सप्टेंबरला घरातून अचानक निघून गेले आहेत. तर रामेश्वर कॉलनी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांच्या शोधानंतरही संबांधितांचा शोध न लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हनुमान नगरातील प्रौढा प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक दीपक महाजन तपास करीत आहेत. पिंप्राळ्यातील ६१ वर्षीय वृद्ध प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत. तर १९ वर्षीय तरुणी बेपत्ता प्रकरणात दाखल अपहणाच्या गुन्ह्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली असून तपास पोलिस कर्मचारी भारती देशमुख करत आहेत. तिन्ही गुन्ह्यातील बेपत्ता नागरिकांची माहिती मिळाल्यास संबंधित पोलिस ठाण्यात किंवा पोलिस मदत केंद्रास (डायल-११२)ला कळवावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT