नाशिक

आदिआदिवासी बांधवांचा दुसऱ्यावासी बांधवांचा दुसऱ्या

CD
मेन फिचर (जिल्हा - शहर) NSK26H32060 (हा फोटो पाच कॉलम वापरावा) जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला बसलेले आदिवासी महिला. ------------- NSK26H32061 (हा फोटो दोन कॉलम वापरावा) दोन्ही फोटो सारखे वापरू नका. आदिवासींना संबोधित करताना प्रतिभा पाटील. ------------ आदिवासी बांधवांचा दुसऱ्या दिवशीही ''ठिय्या'' स्थानिक पातळीवर बैठक; आंदोलक ठाम, मंत्र्यांसोबत चर्चेशिवाय माघार नाही सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : वनपट्टेधारकांच्या प्रलंबित मागण्या पूर्व कराव्यात, दुष्काळी अनुदानाचा सरसकट लाभ मिळावा आदी विविध २७ मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. १२) लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडला आहे. मागण्या पूर्ण न झाल्याने आज दुसऱ्या दिवशीही आंदोलनाचा ठिय्या सुरूच होता. दरम्यान, आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे व शिष्टमंडळाशी मागण्यांबाबत चर्चेला पाचारण केली. संबधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी वनदावे ७५०० प्रलंबित असताना केवळ १७ वनदावे प्रलंबित असल्याचा दावा जिल्हा प्रशाासनाने केला होता. हा दावा खोटा असल्याने या वनदाव्यांच्या पडताळणीचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशात आज अल्पबचत भवनात सुरू होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानावरून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनात ताराचंद बारेला, जेमा बारेला, भरत बारेला, अजय पावरा, इरफान तडवी, कैलास मोरे, सतीश बारेला, रुपसिंग बारेला, मुस्तफा तडवी, सचिन धांडे, मन्सुर मन्सूर तडवी, तडवी, दिनू बारेला आदींनी मोर्चात सहभाग घेतला. चौकट आंदोलक मागण्यांवर ठाम विविध मागण्यांसाठी हजारो आदिवासी बांधवांचा हा ठिय्या आहे. स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर महसूलसह आदिवासी मंत्र्यांशी चर्चा करून आश्वासन मिळाले तरच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. यामुळे आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. चौकट दुष्काळी मदतीसाठी आग्रह दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या पात्र आदिवासी शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व निविष्ठा अनुदान द्यावे. भूमिहीन शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ मिळावा, तसेच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT