शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या ४५ वर्षीय महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिजाबाई राजू पाटील (रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) असे या महिलेचे नाव आहे.
जिजाबाई ११ ऑक्टोबरला पोटदुखी, योनीमार्गातून अतिरक्तस्राव आणि गाठ बाहेर आल्याच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली होती. अतिरक्तस्रावामुळे तिचे हिमोग्लोबिन केवळ ४.९ ग्रॅम होते. प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने रक्त संक्रमण व आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. तपासणीत गर्भपिशवीची सुमारे १२ बाय १० बाय १० सेंटीमीटर आकाराची गाठ असल्याचे निदान झाले.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी व गाठ काढली. विभागप्रमुख डॉ. शीतल लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल कातकडे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. अमित हिवरकर, डॉ. वैभव सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
वेळेवर केलेली शस्त्रक्रिया, रक्त संक्रमण आणि डॉक्टरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महिलेची प्रकृती सुधारली. उपचारानंतर २६ ऑक्टोबर रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांनी उपचारात सहभागी सर्व डॉक्टर, वैद्यकीय पथक व परिचारिकांचे अभिनंदन केले.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.