NSK26H31942
जळगाव : ११व्या ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे अर्ज, निमंत्रणपत्रिका व ऑनलाइन प्रणालीचे प्रकाशन करताना पदाधिकारी.
--------------
‘ऋणानुबंध’ मेळाव्याच्या पत्रिकेचे प्रकाशन
------
ऑनलाइन प्रणालीही सुरू; जानेवारी २७मध्ये जळगावात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या जिल्हा शाखेच्या ११व्या ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळावा १७ जानेवारी २०२७ला जळगावात होणार आहे. या मेळाव्याचे अर्ज, निमंत्रण पत्रिका व ऑनलाइन प्रणालीचे प्रकाशन रविवारी (ता.११) झाले. नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेचे औचित्य साधून स्त्रीशक्तीच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात मेळाव्याचे मागील वर्षाचे स्वागताध्यक्ष रमेश वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली. त्यानंतर रंजना विजय वानखेडे, संगीता संजय विसपुते, रुपाली वाघ, सरिता विसपुते, कांचन विसपुते, सविता मोरे, सरिता दुसाने व नयना दुसाने यांच्या हस्ते अर्ज, निमंत्रण पत्रिका व ऑनलाइन प्रणालीचे प्रकाशन झाले. नवरात्रीच्या पावन पर्वात आयोजित या कार्यक्रमाला अहीर सुवर्णकार महिला मंडळाच्या सदस्यांसह मेळाव्याचे पदाधिकारी, नियोजन समितीचे सदस्य, कार्यकारिणी सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......
ऑनलाइनमुळे प्रक्रिया सुलभ
वधू-वर व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी अर्जासोबत ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे इच्छुक वधू-वर व पालकांना मेळाव्याशी संबंधित माहिती व नोंदणी प्रक्रिया अधिक सोयीस्करपणे पूर्ण करता येईल. समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी व कुटुंबांना परस्पर परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा आहे.
यावेळी मेळावा प्रमुख राजेंद्र भालचंद्र दुसाने, उपप्रमुख दिलीप एकनाथ पिंगळे, नियोजन समिती प्रमुख पंकज अशोक रणधीर, सचिव प्रशांत त्र्यंबक विसपुते, सहसचिव मनोज सुकलाल सोनार व प्रसिद्धी प्रमुख रत्नाकर दुसाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे, विवाहेच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र सुवर्णकार सेना जिल्ह्याच्या वतीने करण्यात आल्याची माहिती मेळावा सचिव प्रशांत विसपुते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.