नाशिक

प्रवासी भाड्याचा वादातुन प्रवाशाला मारहाण

CD
प्रवासी भाड्याचा वाद; प्रवाशाला मारहाण जळगावातील घटना; रिक्षाचालकाने डोक्यात घातला रॉड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : रेल्वेस्थानक ते सिंधी कॉलनी वर्सी महोत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचे भाडे कमी करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रवाशावर खुन्नस ठेवून तो लघुशंका करत असताना रिक्षाचालकाने चक्क डोक्यात लोखंडी रॉड टाकत गंभीर जखमी केले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ळीसगाव येथील पवन दीपककुमार मंदानी (वय-२६) कुटुंबीयांसह शुक्रवारी (ता. ३०) रात्री ज‌ळगावात वर्सी महोत्सवासाठी आले. पत्नीसह कुटुंबीयांना सेवामंडळात सोडून मंदानी व त्यांचे मित्र निखील खियाणी रेल्वेस्थानकाजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून रेल्वेस्थानक रिक्षाथांब्याजवळ आले. एका रिक्षाचालकाला सिंधी कॉलनीत जाण्याविषयी विचारले असता त्याने ३० रुपये प्रति सीट सांगितल्याने तरुणाने २० रुपये देऊ असे सांगितले. त्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने वाद घातला. नंतर मंदानी व त्यांचे मित्र बाजूला लघुशंका करत असता त्यांना रोखून पुन्हा वाद घातला. चालकाला समजवत असताना त्याने रिक्षातून लोखंडी रॉड आणून तो मंदानी यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. चौकट सोनसाखळी हिसकावली त्यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही २ रिक्षाचालकांनी मारहाण केली. या प्रकरणी मंदानी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २ रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करत असताना तरुणाच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व मोबाईल गहाळ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत!" राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; भाजपकडून 'इंडिया' आघाडीच्या मॉक पार्लमेंटवर सडकून टीका

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT