NSK26H35320
जळगाव : पदकविजेते दिशा पाटील व संध्या मोरे.
–––
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत
जळगावच्या खेळाडूंचे यश
(उपशीर्षक)
दोन सुवर्णांसह सहा पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सांगली येथे १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. यात दोन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदके मिळविले.
बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या माध्यमातून जिल्ह्याचा संघ राज्य स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत महिला गटात आयूशी भोसले हिने ६५ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. दिशा पाटील हिने ५७ ते ६० किलो वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच हर्षा सपकाळे हिने ४५ ते ४८ किलो वजन गटात, तर संध्या मोरे हिने ५१ ते ५४ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. पुरुष गटात गौरव बारसे याने ६५ ते ७० किलो वजन गटात, तर भावेश ठाकूर याने ८५ ते ९० किलो वजन गटात कांस्यपदक पटकाविले.
यशाबद्दल पदकविजेत्या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र दिघे, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या युथ अँड एज ग्रुप कमिशनचे चेअरमन नीलेश बाविस्कर, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मोरे, उपाध्यक्ष धनराज कसाट, सचिव चुणीलाल गुप्ता, विशाल बाविस्कर आणि दीपक वाल्डे यांनी अभिनंदन केले.
––––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.